Advanced Scalp Cooling machine introduced in Kalyan; After the Chemotherapy, no worry of the hair loss

Advanced Scalp Cooling machine introduced in Kalyan; After the Chemotherapy, no worry of the hair loss

कल्याणात डॉ. घाणेकर किमो डे केअर सेंटरचा पुढाकार (Dr. Ghanekar Chemo Day Care Center’s initiative In Kalyan City)

कॅन्सर उपचारावरील किमो थेरपी (Chemotherapy) घेतल्यानंतर विशेषतः तरुण वर्ग आणि त्यातही महिलांच्या मानसिकतेवर केस गळण्याचा मोठा परिणाम होत असतो. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामूळे केस गळण्याच्या या समस्येवर आता स्काल्प कुलिंग मशीनचा (Scalp Cooling Machine) पर्याय उपलब्ध झाला आहे. कल्याणातील या पहिल्या वहिल्या अत्याधुनिक मशीनचे डॉ. घाणेकर किमो डे केअर सेंटरमध्ये आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

केस गळतीमूळे नैराश्य येण्याची शक्यता…(The possibility of depression due to hair loss)

कॅन्सर रुग्णांना (Cancer patients) दिल्या जाणाऱ्या किमो थेरपीनंतर केस गळण्याच्या समस्येला कोणताही पर्याय नव्हता. मात्र कीमो घेण्यासाठी येणारे तरुण आणि त्यातही महिला रुग्ण किमोपेक्षा केस गळण्याच्या विचारांनीच चिंताग्रस्त होतात. ज्याचे रूपांतर नंतर न्यूनगंडामध्ये (Infetory complex) होऊन सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांमध्ये मिसळण्यास असे रुग्ण तयार होत नाही असा आमचा आजपर्यंतचा अनूभव असल्याची प्रतिक्रिया डॉ. घाणेकर डे केअरचे प्रमूख रक्तविकार आणि कर्करोगतज्ञ डॉ. अमित घाणेकर यांनी दिली. तसेच संबंधित रुग्णाला नैराश्य येऊन सामाजिक विलगिकरणामूळे त्याच्या जीवनाची गुणवत्ताही बिघडत असल्याचे दाखले यासंदर्भातील अभ्यास अहवालातून समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

 

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे केस गळती होते कमी…(There are low changes to hair loss with this advance technology)

तर किमो थेरपीचा मारा शरीरामध्ये रक्तावाटे होतो. परिणामस्वरूप डोक्यावरील टाळूच्या त्वचेवरील रक्ताभिसरण अधिक असल्यामुळे केस गळती होते. या मशीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कुलंटमुळे टाळूवरील त्वचेचे तापमान 14 ते 15 डिग्री सेल्सियस इतक्या खाली आणून ते मेंटेन केलं जातं. त्यामुळे टाळूवरच्या केसांची गळती 15 ते 20 टक्क्यांवरती येत असल्याची महत्वाची माहिती डॉ. अमित घाणेकर यांनी दिली.

उपचार सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध…

अत्यंत आधुनिक आणि संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही यंत्रणा असून हे उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्याचेही डॉ. अमित घाणेकर यांनी सांगितले. तसेच रुग्णाला देण्यात येणाऱ्या किमो थेरपीनुसार हे मशीन हाताळण्यासाठी आमच्याकडील संपूर्ण स्टाफला त्याचे आवश्यक ते सर्व प्रशिक्षणही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान यावेळी कल्याणातील आघाडीच्या विविध डॉक्टरांनी मशीन पाहण्याच्या कुतूहलापोटी उपस्थिती दर्शवल्याचे दिसून आले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. घाणेकर किमो – डे केअर सेंटर,
A -205, देसाई कॉम्प्लेक्स, बैलबाजार चौक,
कल्याण – पश्चिम
मोबाईल – 9920018399

Credits by LNN

Add Comment

Your email is safe with us.

Sign In Global Kalyan

Account details will be confirmed via email.

Reset Your Password

Secured By miniOrange